

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कार्तिक एम. यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शुभा बी. यांना कोणतीही नवीन जबाबदारी न देता त्यांना तात्पुरते मूळ विभागात काम करण्यास सांगण्यात आले आहे.
सरकारने बुधवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, संजय गांधी ट्रॉमा अॅण्ड ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कार्तिक एम. हे आता महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
शुभा बी. यांच्या अचानक बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ही तातडीची कारवाई नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नवीन आयुक्त कार्तिक एम. यांच्यासमोर हिवाळी अधिवेशन तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांसह अनेक महत्त्वाची आव्हाने उभी आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta