Saturday , March 7 2026
Breaking News

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या बी. फार्मासी दुसऱ्या आणि सहाव्या सत्रातील परिक्षांचे निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये बी. फार्मासी या अभ्यासक्रमात दुसऱ्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कु. श्रुती वि. हिरोजी हिने ८३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. चंदना भू. सावंत हिने ८३.०९% द्वितीय क्रमांक तर कु. धनश्री कदम हिने ८२.९०% गुण मिळवत तृतीय क्रमांक
प्राप्त केलेला आहे. तसेच सहाव्या सेमिस्टरमध्ये कु. तनिषा तुकाराम पाटील हिने ९०% गुण मिळवून प्रथम क्रमांक कु. श्रवणा नागराली हिने ८७.६० % द्वितीय क्रमांक तर कु. मंजुळा दनगेर हिने ८५.३३% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याच बरोबर या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजु यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *