Sunday , September 20 2026
Breaking News

सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तिघांना अटक; टिळकवाडी पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या तीन युवकांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री गस्ती दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवेगळ्या भागांत ही धडक कारवाई केली.

पहिल्या कारवाईत केएलएस हायस्कूल परिसरात अंमली पदार्थाच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्या अभिषेकला ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या कारवाईत आरपीडी कॉलेजजवळ इराण्णाला संशयास्पद स्थितीत पकडण्यात आले. तर तिसऱ्या कारवाईत अनगोळ मराठी शाळा परिसरात करण याला पोलिसांनी अटक केली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तिघेही अंमली पदार्थाच्या नशेत होते. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील वाढत्या ड्रग्जविरोधात अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *