Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेतील आरोग्य अधिकारी पद संपुष्टात; डॉ. नांदरे यांची बंगळुरूला बदली

Spread the love

 

बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या आदेशानुसार कार्यरत हेल्थ ऑफिसर डॉ. संजीव नांदरे यांना त्यांच्या पदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. यानंतर त्यांची बदली बंगळुरू आरोग्य विभागात करण्यात आली आहे.

डॉ. नांदरे यांनी महापालिका स्तरावर जन्म–मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, ट्रेड परवाने तसेच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी उपक्रमाची जबाबदारी सांभाळली होती. आरोग्य अधिकारी पद रद्द झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील अभियंता अशोक कुमार सज्जन यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. सज्जन हे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेत रुजू झाले आहेत.

महानगरपालिका हद्दीतील शहरातील रुग्णालये बंद असल्याने आरोग्य अधिकारी पद निष्क्रिय ठरल्याचा अहवाल राज्य सरकारने दिला आहे. त्यानंतर हे पद रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामुळे पुढे बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्याविना कार्यरत राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *