
बेळगाव : मार्कंडेय नदीतील होनगा ब्रीजखाली चार मृत प्राण्यांचे मृत्यूदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते हे मृतदेह अंदाजे २-३ दिवसांपासून नदीत असल्याचे दिसत असून त्यांचे विघटन सुरू झाल्याने दूषित तेलकट थर संपूर्ण नदीपात्रात पसरला आहे.
नदीत निर्माण झालेला हा दुर्गंधीयुक्त थर आणि पाण्याचे वाढते प्रदूषण पाहता होनगा परिसर व जवळील गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणी दूषित झाल्यास संसर्ग फैलावण्याचा मोठा धोका आहे.
याबाबतीत फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली असून तात्काळ सदर मृत प्राणी हटवले जावेत अशी मागणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta