
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावात राष्ट्रीय महामार्ग 48 वर दरोडेखोरांनी एटीएम मशीनच ढकलगाडीवर (हातगाडी) वरून घेऊन पळविल्याची घटना घडली.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी, 3 दरोडेखोर प्रथम एटीएममध्ये घुसले आणि तेथील सेन्सरला आवाज येऊ नये म्हणून स्प्रे मारला. नंतर त्यांनी एटीएम मशीन ढकलगाडीवर ठेवून 200 मीटर गाडी चालवली. तेथून त्यांनी एटीएम मशीन त्यांच्या गाडीत हलवली आणि पळून गेले.

चोरांनी एटीएम मशीन चोरली, परंतु ते उघडण्यात किंवा पैसे चोरण्यात त्यांना यश आले नाही, म्हणून त्यांनी मशीन रस्त्यावर फेकून दिले आणि पळून गेले असल्याची माहिती बेळगावचे पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
30 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. मशीनमध्ये 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याचे कळते. चोरट्यांनी ते पैसे सुरक्षित ठिकाणी नेऊन पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘चोरांनी गॅस कटरने एटीएम मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. तथापि, एटीएममध्ये कडक सुरक्षा असल्याने ते ते उघडू शकले नाहीत. अयशस्वी झाल्याने, चोरांनी रागाच्या भरात मशीन अर्धा किलोमीटर अंतरावर फेकून दिले आणि पळून गेले.’
काकती पोलिस ठाण्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चोरांचा माग काढण्यासाठी सापळा रचला.
Belgaum Varta Belgaum Varta