

बेळगाव : बेळगावमधील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.
विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरमध्ये गोवा भाजप उत्तर विभाग अध्यक्ष सध्या उपचार घेत असून यांच्या तब्येतीची विचारपूस करून डॉ. रवी पाटील आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी राज्य भाजप मेडिकल सेलचे सदस्य डॉ. रवी पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगावमधील नगरसेवक, भाजप नेते, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
श्रीपाद नाईक हे सध्या पर्यटन, बंदर, जलमार्ग राज्यमंत्रिपदी कार्यरत असून याआधी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचेदेखील काम पाहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta