Saturday , April 18 2026
Breaking News

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील ’मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करणार

Spread the love


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची छत्रपती संभाजीराजे यांना ग्वाही
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रिडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी 6 मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यानिमित्त, महाराजांनी कुस्तीच्या वृद्धीसाठी दिलेले अमूल्य योगदान व या क्षेत्रात केलेले लोकोत्तर कार्य यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महाराजांनी कोल्हापूरात उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासबाग कुस्ती मैदानात ’हिंदकेसरी’ सारख्या राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करावे, या मागणीसह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावर, हिंदकेसरी स्पर्धा ही न्यायालयीन कचाट्यात अडकली असल्याने तितकीच प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय पातळीवरील मातीतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी संभाजीराजे यांना दिली. यामुळे, छत्रपती शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कुस्ती या खेळालाही त्याचा भरीव फायदा होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याविषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले श्री बृजभूषण हे स्वत: एक उत्तम मल्ल आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान हे त्यांना चांगलेच माहीत आहेत. मी महाराजांच्या विचार कार्याबद्दल त्यांना माहिती देत असताना ते भारावून गेले. महाराजांप्रती त्यांच्या मनी असणारा आदरभाव व कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना छत्रपती शाहू महाराजांचा हिंदी भाषेतील चरित्र ग्रंथ भेट दिला.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

Spread the love  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *