Thursday , December 11 2025
Breaking News

टिप्परखाली सापडून ब्रम्हनगरचा युवक ठार

Spread the love


पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली ही घटना
बेळगाव : भरधाव टिप्परखाली सापडून ब्रम्हनगर (बेळगाव)चा 35 वर्षीय इसम जागीच ठार झाला. विजय परशुराम नाईक असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.
विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता भरधाव टिप्परने त्याला ठोकर दिली. या ठोकरीने विजय दुचाकीवरून खाली पडला आणि टिप्परच्या चाकात सापडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयचा मृत्यू झाला. विजय हा लक्ष्मी टेक येथे पाणीपुरवठा विभागात खासगी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते .

About Belgaum Varta

Check Also

समितीच्या जीवावर पदे भूषविलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून अलिप्त!

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *