Monday , September 21 2026
Breaking News

बुधवारी दहावीच्या व्दितीय भाषा पेपरला खानापूर तालुक्यातील ३४ विद्यार्थ्यांची दांडी

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : बुधवारी दि. ३० रोजी दहावी परीक्षेच्या व्दितीय भाषा पेपरला संपूर्ण खानापूर तालुक्यातून ३४ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातुन दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६७ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३३ विद्यार्थी हजर राहून दहावीची व्दितीय भाषा परीक्षेचा पेपर सुरळीत पार पडला.
खानापूर शहरासह तालुक्यात एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती.
सकाळी १० वाजल्या पासून दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती.
यामध्ये खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूल, मराठा मंडळ हायस्कूल, व सर्वोदय इंग्रजी हायस्कूल असुन तालुक्यातील जे पी व्ही विद्यालय गर्लगुंजी, जांबोटी विद्यालय जांबोटी, पारिश्वाड हायस्कूल पारिश्वाड, सरकारी हायस्कूल चिगदिनकोप, एम जी हायस्कूल नंदगड, हलशी हायस्कूल हलशी, सरकारी हायस्कूल गुंजी, लोंढा हायस्कूल लोंढा, सरकारी लिंगनमठ हायस्कूल लिंगनमठ, इटगी हायस्कूल इटगी, होली क्राॅस हायस्कूल बिडी, एम एन एच एस हायस्कूल बिडी, अशी एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती.
बुधवारी सकाळी १२ वाजताच दहावीच्या व्दितीय भाषा पेपला बेळगांव जिल्हा डाईट काॅलेजचे प्राचार्य श्री. शिंदूर यांनी खानापूरातील ताराराणी हायस्कूल, मराठा मंडळ हायस्कूलच्या दहावी परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील दहावी परीक्षा केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कोणताच गैरप्रकार आढळुन आला नाही. सर्वत्र शांततेत दहावीचा व्दितीय भाषा पेपर सुरळीत पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *