
बेळगाव : नंदिहळ्ळी – राजहंसगड रस्त्यावर आज रात्री बिबट्याचे दर्शन झाले, त्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड रस्त्यावरून वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते तसेच सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या शेतात ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायासाठी बेळगावसारख्या ठिकाणाहून येण्या-जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रात्रीच्या अंधारात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नंदिहळ्ळी, राजहंसगड भागातील नागरिकांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta