
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे.
हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले होते, आता यांची झारखंड येथे 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 69 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संत मीराचा फुटबॉल संघ विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात वेगा हेल्मेट ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाप्पा बिडी व सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पवार यांच्या हस्ते दोन्ही मुलींच्या फुटबॉल संघांना फुटबॉल किट प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, शामल दड्डीकर, पौर्णिमा बाळेकाई यांच्या समवेत संघ रवाना झाला आहे. या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष महादेव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नायक यांचे प्रोत्साहान लाभत आहे.
या 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघात कर्णधार निधीशा दळवी उपकर्णधार समीक्षा खन्नुरकर, गोलरक्षक अनन्या रायबागकर ,समृद्धी घोरपडे, प्रणिती बडबंजी, हर्षिता गवळी, कनिष्का हिरेमठ, आदिती सुरतेकर, कृतिका हिरेमठ, समृद्धी कोकाटे, पूर्वा बडमंजी, आरोही देसाई, सर्व बेळगाव, प्रणय्या शेट्टी, मौल्या श्री पी, मंगळूर, तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार दीपा बिडी, उपकर्णधार श्रेया लाटुकर, सृष्टी सातेरी, अमृता मालशेय, हर्षदा जाधव, सृष्टी येळ्ळूरकर, संचिता सुतार, मोनिता रिंग, दीपिका रिंग, सिंचना तिगडी, श्रद्धा भंडारगळी सर्व बेळगाव प्रतिक्षा शेट्टी, लक्ष्या सी, मौल्या एस, खुषी करकेरा, देविका अल्वा, तश्मया जोगी, सर्व मंगळूर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta