
बेळगाव : नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x 100 मीटर मिडले रिले मध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले. कुमारी वेदा हिला शाळेचे चेअरमन ऍड. चंद्रहास अनवेकर, प्रिन्सिपल नवीना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक धनाजी सर, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, हिंदचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन तर एनआयएस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभते.
Belgaum Varta Belgaum Varta