
बेळगाव : सिंधुदुर्ग जलतरण संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या गोवावेस व अशोक नगर येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट्स क्लबच्या सानिध्याखाली सराव करत असणाऱ्या डॉल्फिन ग्रुपचे मास्टर्स जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत भरत पाटील याने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले. त्याचबरोबर कल्लाप्पा पाटील यांनी टॉप टेन मध्ये येऊन दहावा क्रमांक मिळविला. बाकी इतर जलतरणपटूनी तीन किलोमीटर व दोन किलोमीटर स्पर्धा अत्यंत चिकाटीने पूर्ण केली. यशस्वी जलतरणपटूंची नावे पुढीलप्रमाणे
श्री. अरुण जाधव, राजू पाटील, मुकेश शिंदे, गजानन शिंदे, महांतेश नवलगुंद, राजू पुजारी, प्रदीप पाटणकर, प्रशांत कांबळे, राजू जांगळे व महादेव केसरकर
वरील सर्व जलतरणपटूंना रोख रक्कम मेडल व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या सर्व जलतरणपटूंना एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार व कल्लाप्पा पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन लाभते.
Belgaum Varta Belgaum Varta