
बेळगाव : कडोली (ता. बेळगाव) येथील मराठी साहित्य संघातर्फे गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता “काव्यातरंग” कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी साहित्य संघाच्या श्री. कलमेश्वर वाचनालयात हे कविसंमेलन होईल.
या कविसंमलेनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली एक कविता सोमवार दि. २२ डिसेंबर पर्यंत श्री. गिरीधर गौंडवाडकर यांच्या ८९५१३६०६३५ या मोबाईल क्रमांकावर पाठवावी. तसेच काव्यवाचनासाठी दि. २५ डिसेंबर रोजी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta