

बेळगाव : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावतर्फे उद्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मराठा वधू-वर मेळावा बेळगाव शहरातील रूपाली कन्वेंशन सेंटर, जुना धारवाड रोड येथे हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यास कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. मारुतीराव मुळे वधु वर मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा मेळावा म्हणजे मराठा समाजातील विवाह इच्छुक मुलामुलींसाठी आपला योग्य जीवनसाथी निवडण्याची एक सुवर्णसंधी असल्यामुळे संबंधितांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा. तसेच इच्छुक वधू-वर अथवा त्यांच्या पालकांनी अधिक माहितीसाठी 9945560993 अथवा 9591357270 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Belgaum Varta Belgaum Varta