
बेळगांव (प्रतिनिधी) : येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या समूहाने नंदिनी दुग्ध प्रकल्पाला शैक्षणिक भेट दिली.
कॉलेजमधील सामुदायिक औषधशास्त्र विभागाने नंदिनी दूध डेअरीला क्षेत्रभेट आयोजित केली होती. सामुदायिक औषधशास्त्र विभागाच्या सदस्यांनी बीएचएमएस अभ्यासक्रमातील तिसऱ्या वर्षाच्या ३५ विद्यार्थ्यांसोबत डेअरीला भेट दिली. डेअरीतील व्यवस्थापिका श्रीमती महालक्ष्मी यांनी दूध संकलन, साठवणूक, पाश्चरायझेशन, इतर दुग्धजन्य पदार्थ बनवणे, पॅकिंग इत्यादी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आणि डेअरीच्या यंत्र उपकरणांची व्यवस्था दाखवली. ही एक शैक्षणिक भेट होती. कारण विद्यार्थ्यांनी दुधामुळे होणारे रोग आणि दुधाची गुणवत्ता तपासण्याच्या चाचण्यांबद्दल माहिती मिळवली. विद्यार्थ्यांनी या भेटीचा लाभ घेतला. या भेटीच्या संयोजनासाठी डॉ. सबीहा रंगरेज यांचे नेतृत्व लाभले होते. तसेच प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम यशस्वी करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta