
बेळगाव : संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. पार्श्वभूमीवर नाताळ सणाच्या आगमनासाठी बेळगाव शहर व परिसर सज्ज झाला आहे.
खास करून बेळगाव येथील कॅम्प परिसरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण कॅम्प परिसर विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झगमगून गेला आहे. ख्रिश्चन बांधवांचा नाताळ हा सण आहे. नाताळ सणाला चर्च आणि निवासस्थाने सजवण्याची परंपरा आहे. तसेच ख्रिसमस ट्री आणून त्याला स्टार्स फुगे बेल्स इत्यादी वस्तूंनी सजविले जाते.
बेळगावात ख्रिश्चन धर्म बांधवांची संख्या मोठी आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने कॅम्प परिसरात मागील आठ दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील चर्चमध्ये बुधवार दि. २४ रोजी मध्यरात्री भगवान येशुंचा जन्मदिवस सामुदायिक प्रार्थनेसह साजरा होणार आहे. नाताळ निमित्त चर्च आणि घरांमधून भगवान येशूंच्या जन्माचे देखावे ही सादर करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta