Tuesday , March 3 2026
Breaking News

प्रेम बुरुडची क्राॅस कंट्री स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरांवर निवड

Spread the love

 

कावळेवाडी…. येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड यांने नुकताच म्हैसूर येथे झालेल्या ६० वी क्रास कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरांवर गरुड झेप घेतली आहे. त्याने दोन कि.मि. अडथळा स्पर्धेत अवघ्या ५ मि. ४३ सेंकदात हे अवघड अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राष्ट्रीय स्तरांवर २४ जानेवारीला रांची झारखंड येथे या स्पर्धा होणार आहेत.
सध्या तो मद्रास रेंजिमेट स्पोर्ट्स सेंटर विलिंग्डन उटी येथे इ. नववीत शिकत असून खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रतिकुल परिस्थितीत कावळेवाडी सारख्या दूर्गम खेड्यांतून त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे वडील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रमाने आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही इच्छा शक्तीच्या जोरावर प्रेमला घडवले आहे. याचा सार्थ अभिमान विविध सामाजिक संस्था, समाजातील दानशूर व्यक्तींना वाटतो. अनेक व्यक्तिंनी आर्थिक सहकार्य केले आहे. प्रोत्साहन, कौतुकाची थाप देऊन सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे कावळेवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पाच हजार जमा करून सहकार्य केले.
यावेळी संतोष दरेकर, वाय पी नाईक, ऍड. नामदेव मोरे, एस आर मोरे, वनिता कणबरकर, राजू ना. बुरुड, केदारी कणबरकर, पी पी बेळगावकर, रामचंद्र बडसकर शाळेतील सर्व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *