Friday , April 17 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 डिसेंबर, 29 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडले.

खेळगट ते इयत्ता तिसरी वर्गाचे स्नेहसंमेलन

प्रारंभी या ‘विश्वाची आम्ही लेकरे’ व’ गगन सदन तेजोमय ‘या स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते संगीत, नृत्य, नाटक, गायन, कल्पकता, नेतृत्व, आत्मविश्वास, सृजनशीलता या सांस्कृतिक मूल्यांचे अनावरण करून कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण रीतीने उद्घाटन करण्यात आले. यानंतर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी शाळेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श शाळेसमोर असून प्रयोगशाळा, बालवाडी इमारत नूतनीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचा केवळ पुस्तकी किडा न होता संपूर्ण विकास साधणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न, वाचनाचा पुरेपूर फायदा घेणे, वाचलेलं पडताळणी करण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करणे जेणेकरून अंधश्रद्धा घालविणे या पैलूंवर अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी प्रकाश पाडला. आभार बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.
जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बालवाडी विभागप्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश गुरव, विद्यार्थिनी प्रतिनिधी रमा देसाई, पालक वर्ग शिक्षक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका रूपाली हळदणकर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

इयत्ता चौथी ते दहावी वर्गांचे स्नेहसंमेलन
कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाचे शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या मार्गदर्शनाने स्वागत गीताने झाली. शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
संगीत, नृत्य, नाटक, गायन, कल्पकता, नेतृत्व, सृजनशीलता आणि आत्मविश्वास या सांस्कृतिक मूल्यांचे अनावरण करून कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण रीतीने उद्घाटन झाले. यानंतर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रयोगशाळा प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कमल हलगेकर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, कला शिक्षिका लता नगरे, संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर, पद्मजा कुऱ्याळकर, शिक्षक, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *