Tuesday , March 3 2026
Breaking News

ज्येष्ठानी सर्वप्रथम शरीर स्वास्थ्य राखणे महत्वाचे : ज्येष्ठ रंगकर्मीं प्रसाद पंडित

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठानी घरात अडगळ ठरू नये यासाठी सर्वप्रथम शरीर स्वास्थ्य राखणे महत्वाचे आहे असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मीं प्रसाद पंडित यांनी दिला.
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या व्हॅक्सिन डेपो येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या उद्यानात आयोजित स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने श्री पंडित बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुदृढ शरीर मनालाही सशक्त बनवते यासाठी व्यायाम, आहार व योगाभ्यासाबद्दल काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या.
यावेळी उद्घाटन समारंभ कार्यक्रमात प्रारंभी ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रकाश कुडतरकर व विठ्ठल पोलो यांची श्रद्धांजली वाहणारी भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी व क्वेस्ट टुर्सचे व्यवस्थापक प्रभाकर सुतार उपस्थित होते.
यावेळी सभासदांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धाचे उद्घाटन श्री. पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची व रिंग थ्रो स्पर्धेत विजेते ठरलेले अनंत सावंत, रविंद्रनाथ जुवळी, औदुंबर शेट्ये, सुधाकर राणे, ज्योती अगरवाल, अश्विनी पाटील, संगिता जोशी व मीना कुलकर्णी यांना रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. सदर बक्षीसे क्वेस्ट टुर्स यांनी प्रायोजित केली होती. यावेळी महापौर मंगेश पवार यांनीही सदिच्छा भेट दिली.
यावेळी डॉ. बी.जी.शिंदे, जगमोहन अगरवाल, रविंद्रनाथ जुवळी, डॉ. श्रेयश चौगुले व औदुंबर शेट्ये यांनी विविध गाणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी निळकठ गाडगीळ (सी.ए.), विजय पाटील (सी.ए), विजय वाईगडे, वनिता जोशी व महेश सुतार यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुरेन्द्र देसाई पाहुण्यांची ओळख शिवराज पाटील तर आभार प्रदर्शन विजय वाईगडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *