Tuesday , March 3 2026
Breaking News

नामस्मरणाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने झटणारे किणये येथील शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी

Spread the love

 

बेळगाव : मानसिक समाधानासाठी नामस्मरण अत्यंत आवश्यक असून, नामस्मरणाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने किणये येथील शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी गेली सुमारे ४८ वर्षे विनामूल्य भजन व भावगीते शिकवण्याची परंपरा निरंतरपणे जपत आहेत.

वारकरी संप्रदायातील संतांचे अभंग, गवळणी, भावगीते व भक्तीगीते यांचे संस्कार समाजात रुजावेत, या सेवाभावी भावनेतून गुरुजींचे हे कार्य अविरत सुरू आहे. सुमारे ९०० पेक्षा अधिक महिलांना त्यांनी विनामूल्य भजनाचे प्रशिक्षण देत नामस्मरणाची आवड निर्माण केली आहे.

गुरुजींच्या या कार्यामुळे अनेक महिलांच्या जीवनात भक्ती, सकारात्मकतेचा प्रकाश पडला असून, समाजात वारकरी परंपरेचा वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडत आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सेवाभावी योगदानाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शंकर गुरुजी सकाळी नऊ वाजता कीणये येथून निघाले की विविध भागांमध्ये ठरलेल्या वेळेत पंधरा मिनिटे आधी पोहोचून भजन शिकवितात व रात्री 11 च्या सुमारास घरी परततात, प्रत्येक मंडळास किमान दोन तास आठवड्यातून एकदा नियोजन गुरुजींनी केलेला आहे.

मच्छे, चौगुले नगर, मजगाव, राजाराम नगर, खादरवाडी, भाग्यनगर, पटवर्धन लेआउट वाडा कंपाऊंड, ज्ञानेश्वर मंदिर, वडगाव संभाजीनगर, गणेश मंदिर, जिव्हेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर बाजार गल्ली वडगाव आदी ठिकाणी त्यांचे भजन रुपी सेवा निरंतरपणे सुरू आहे. घरची परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत वर्ष 1974 मध्ये त्यांनी बीकॉमची पदवी मिळवली. प्रसंगी शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि खाणीत दगड फोडण्याचे काम त्यांनी केले.
शाळेत असताना अंतर शालेय गायन स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षिसे मिळविले. भावगीत-भक्तिगीत, गाण्यासाठी शंकर पाटील यांना पहिले आमंत्रण दिले जात असे. कविता करण्याचा त्यांना छंद असून, आतापर्यंत त्यांच्या पन्नास हून अधिक कविता विविध दिवाळी अंक आणि दैनिकात प्रसिद्ध झाले आहेत नाटक बसविण्यासह त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. पौराणिक ऐतिहासिक आणि कौटुंबिक नाटके केले आहेत यामध्ये स्त्री व पुरुष भूमिका ही साकारल्या आहेत ‘मराठा गडी यशाचा धनी’ आणि ‘जवळचा झुंजार’ या नाटकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नाटक, दिग्दर्शन आणि संगीत नाटकांना चाली बसून देण्याचे काम हे गुरुजी केले आहे. वर्ष 1981-82 मध्ये नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत बेळगाव येथे आले असता त्यांच्या संमुख शंकर गुरुजींचे भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यांच्याकडे शिकणाऱ्या महिलांना भजन सोबत शिस्तही शिकविले आहे.

शंकर गुरुजी यांना संगीत रत्न, बेळगाव भूषण, महाराष्ट्र भूषण, समाजभूषण, कलारत्न, वेकेशनल अवार्ड असे बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा येथील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

——————————————————————–

विठ्ठल मंदिर येथे बेळगाव येथील पहिले भजन मंडळ 125 वर्षांपूर्वी सुरू झाले होते.
कोविड काळामध्ये मंदिरातील भजन बंद झाले. आमच्या विनंतीला मान देऊन ते विठ्ठल मंदिरात महिलांना विनामूल्य भजन सेवा देत आहेत दर मंगळवारी दुपारच्या वेळेत ही सेवा सुरू असून याला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गुरुजींच्यामुळे पुन्हा विठ्ठल मंदिरमध्ये भजन सुरू आहे.

– सौ. रुपाली विश्वनाथ सव्वाशेरी
अध्यक्ष, विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळ, बाजार गल्ली वडगाव, बेळगाव.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *