Sunday , September 20 2026
Breaking News

माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

Spread the love

 

पुणे – पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली होती.

पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरू होते. आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

जन्म 1 मे 1944 रोजी झाला असून, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात 6 वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून काम केले होते. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते आणि त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही पद भूषवलं होतं. विशेष म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे बजेट मांडणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुण्यात ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला एक नवी ओळख मिळवून दिली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *