Tuesday , March 3 2026
Breaking News

साखर कारखाना बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या ७

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन काल तीन कामगारांचा मृत्यू झाला. आज उपचारादरम्यान मृतांच्या संख्येत वाढ होऊन आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला.

मृत झालेल्यांमध्ये मंजुनाथ तेरदाळ, मंजुनाथ काजगार, भरतेश सारवाडी आणि गुरुपादप्पा यांचा समावेश आहे.

कारखान्याच्या कंपार्टमेंट क्रमांक १ मध्ये ही घटना घडली आणि भिंतीची दुरुस्ती सुरू असताना स्फोट झाला. ही घटना मुरुगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *