Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर येथे गवंडी व सेंट्रिंग कामगाराकरीता रविवारी मार्गदर्शन मेळावा

Spread the love

 

येळ्ळू : समाज सारथी सेवा संघ येळ्ळूर यांच्यामार्फत गवंडी व सेंट्रीग कामगारकरीता मार्गदर्शन मेळाण्याचे आयोजन केले असुन हा मेळावा रविवार ता. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्री चांगळेश्वरी मंदिर येथे संपन्न होणार आहे. या मेळाण्यासाठी ॲड. एन आर लातुर अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना बेळगाव हे कामगाराना कामगारकार्ड काढण्यापासून ते त्याना मिळणाऱ्या सुविधा यावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सौ. लक्ष्मी मासेकर येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमाला गव्ह. कॉट्रॅक्टर विजय धामणेकर, रोटरी जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक, अभियंते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विवेक धामणेकर, रिजनल हेड आल्ट्राटेक अशोक रेड्डी कोलूर, टेकनिकल ऑफीसर अल्ट्राटेक गणपती मुंबारे व सोनिया अनगोळकर, उद्योजक आर. एम. चौगुले, समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर, सेवानिवृत्त पिडीओ दुर्गापा ताशिलदार व नौदल लेप्टनंट चंदन कुमार खेमणाकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कामगारानी विचारलेल्या अडचणी व समस्यांचे निवारण करून त्याना मार्गदर्शन करणार असल्याने परिसरातील कामगार वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज सारथी सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *