Saturday , March 7 2026
Breaking News

पूर्ववैमनस्यातून न्यू गांधीनगर येथे तरुणावर चाकूने वार

Spread the love

 

 

बेळगाव : शुक्रवारी न्यू गांधीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार केल्याची घटना आज घडली असून ज्या तरुणाने वार केला तो एका खून प्रकरणातील आरोपी आहे. तो सध्या जामीनावर सुटला आहे.

खून प्रकरणातील आरोपी असलेल्या मुझम्मिल याने दिशांत चावूस याच्याशी झालेल्या पूर्ववैमनस्यातून दिशांत चावूस याच्या छातीवर चाकूने वार केले. लागलीच गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. माळमारुती पोलिस स्थानकाचे सीपीआय बी. आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *