Monday , September 21 2026
Breaking News

उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवारी

Spread the love

 

उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी होणाऱ्या 25 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला गावातील नागरिक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या मुहूर्तमेढचे पूजन ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि माऊली दूध उत्पादक संघाचे मालक शरद भरमा होनगेकर आणि त्यांच्या सौ. सुनीता होनगेकर या दांपत्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष संभाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न होणार असून अनेक मान्यवर मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर आणि अकादमीचे सेक्रेटरी एन. ओ. चौगुले आणि कमिटीने कळविले आहे.
फोटो.
लोगो.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *