Monday , September 21 2026
Breaking News

शुभम शेळके यांना हद्दपार करा: करवे कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरूच

Spread the love

 

बेळगाव : युवा समिती सीमा भाग अध्यक्ष युवा नेते शुभम शेळके यांच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा कोल्हेकुई सुरू केली असून शुभम शेळके यांच्यावर गुंडा ॲक्ट लावून त्यांना बेळगाव शहरातून हद्दपार करावे, अशी हास्यास्पद मागणी ‘करवे’ने आज पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आज पोलिस आयुक्त कार्यालयात गेलेल्या कर्नाटक रक्षण वेदिके कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, राजकीय दबावामुळे जर पोलिस विभागाने शुभम शेळके यांच्या संरक्षणासाठी हस्तक्षेप केला तर ते गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांच्या निदर्शनास आणून देतील, पोलिसांच्या दिरंगाई धोरणाचा निषेध करत बंगळुरूसह राज्यभर निदर्शने करतील.

बेळगाव शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये देशद्रोही युवा नेते शुभम शेळके यांच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल झाले आहेत? आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला आहे? तुम्ही किती कन्नड समर्थक कार्यकर्त्यांविरुद्ध रौडी शीट उघडले आहे? तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व कन्नडवासीयांना तात्काळ द्यावीत. त्याचप्रमाणे देशद्रोही शुभम शेळके यांना रौडी शीटर म्हणून गुंडा कायद्यांतर्गत अटक का केली नाही? असा सवाल देखील करवे कार्यकर्त्यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *