Tuesday , March 3 2026
Breaking News

हुबळी येथील “त्या” निंदनीय घटनेचा बेळगाव भाजपकडून निषेध

Spread the love

 

बेळगाव : 7 जानेवारी रोजी पोलिसांनी हुबळी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना विवस्त्र केल्याची निंदनीय घटना हुबळी येथे घडली. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि भाजप महिला मोर्चातर्फे आज भव्य मोर्चा काढून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष बेळगाव व भाजप महिला मोर्चातर्फे आज बेळगाव येथील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चादरम्यान राणी चौकातून राज्य काँग्रेस तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना भाजपतर्फे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यात महिलांची सुरक्षा महत्त्वाची असून पोलीस हे समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असतात गुंडगिरी करण्यासाठी नाही. काँग्रेस सरकार राज्यातील शांती व सुव्यवस्था भंग करत आहे. राज्यात महिलांसोबत केले जाणारे असभ्यवर्तन ही सरकारसाठी शरमेची बाब असून हुबळी येथे घडलेली घटना ही निंदनीय आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. भाजप महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, भाजप कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केली आहे ही घटना निंदनीय असून भारतीय जनता पक्ष या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. असे गैरप्रकार जर सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत घडत असतील तर तेच सरकारसाठी लांचनास्पद आहे. हुबळी शहरात घडलेल्या या घटनेचा तसेच सिद्धरामय्या सरकारचा आम्ही भाजप महिला मोर्चातर्फे निषेध करत आहोत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *