Monday , September 21 2026
Breaking News

रयत संघटनेतर्फे रविवारी भिवशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे भिवशी (ता.निपाणी) येथे शेतकरी मेळावा आणि संघटनेच्या शाखेचे उद्घाटन रविवारी (ता.११) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. भिवशी येथील हालसिद्धनाथ दूध डेअरी समोर आयोजित मेळाव्यात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार हे शेतकऱ्यांना विविध समस्या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष सुनील पाटील, बबन जामदार, तालुका कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास भिवशी व परिसरातील संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *