Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत ३ फेब्रुवारीपासून ग्रामदैवत महालक्ष्मी त्रैवार्षिक यात्रेसह वास्तुशांती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शहरवासीयांचे जागृत ग्राम दैवत-वैभव संपन्न श्री महालक्ष्मी देवीची नूतन मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण आणि त्रैवार्षिक यात्रेचे मंगळवार पासून (३ फेब्रुवारी) शनिवार अखेर (ता.७ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महालक्ष्मी देवस्थान आणि अभिवृद्धी संघाने दिली आहे.
मंगळवारी (ता.३) सकाळी ११ वाजता नूतन श्री. महालक्ष्मी मूर्ती आगमन व सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मंगळावरपासून दररोज अखंड नाम जप होणार आहे बुधवारी (ता.४) सकाळी ७.४५ वाजता गणेश पूजन आणि होम हवन होईल. गुरुवारी (ता.५) नवीन मंदिर वास्तुशांती आणि होम हवन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता.६) सकाळी नूतन मूर्ती प्राणप्रतीष्ठापणा व कळसारोहण, दुपारी ४ नंतर त्रैवार्षिक यात्रेस प्रारंभ होऊन देवीची ओटी भरणे, नैवेद्य, आंबील कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता.७) सकाळी अभिषेक, पूजा ओटी भरणे असा कार्यक्रम होईल.
रविवारी (ता.८) सकाळी अभिषेक पूजा, दुपारी १२ वाजता महालक्ष्मीच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. सोमवारी (ता.९) सकाळी अभिषेक, पूजा. देवी याग, होम हवन होणार आहे. होम हवन कार्यक्रमाला बसणाऱ्यांनी यात्रा कमिटीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी अभिषेक पूजा, संध्याकाळी ३ ते ५ या वेळेत कुंकूमार्चन, रात्री ७ ते ११ देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. ११) दुपारी १२ वाजता गांधी चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *