Sunday , July 26 2026
Breaking News

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करावे

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; क्रांतिवीर संगोळी रायण्णा रथाची मिरवणूक

निपाणी(वार्ता) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व लढाईत त्यांच्या समवेत विविध जाती, धर्मातील क्रांतिकारकांनी त्यांना साथ दिली आहे. संगोळी रायण्णा यांच्या कार्याची दखल घेऊन नंदगड येथे काँग्रेस सरकार तर्फे विविध शैक्षणिक सुविधा व उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे क्रांतिकारकांचे प्रत्येकाने स्मरण करावे, असे आवाहन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले.
येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यासह वीरज्योतीची शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील तहसीलदार कार्यालयापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. बेळगाव नाका, जुना पी. बी. रोड, कित्तूर चन्नमा चौक, निपाणी मेडिकल, धर्मवीर संभाजीराजे चौक, चिक्कोडी रोडमार्गे महात्मा बसेश्वर सर्कल येथून मिरवणूक चिक्कोडीकडे रवाना झाली. तत्पूर्वी विविध महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत झाले.
मिरवणुकीत तहसीलदार सुरेश मुंजे, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी, कार्यालयीन अधीक्षक सुदीप चौगुला, उपतहसीलदार एम. एन. ढंगी, तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड, महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी सुप्रिया जडगे, नगरपालिकेचे अभियंते लहु मधाळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते सुजय पाटील, महादेव बरगाले, महादेव कौलापुरे, रामचंद्र पुजारी, सिद्धलिंग चिगरे, बाळासाहेब कमते, संदीप इंगवले, रवींद्र श्रीखंडे, भालचंद्र पारळे, यासीन मनेर, फारुख पटेल यांच्यासह पोलीस, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *