Sunday , July 26 2026
Breaking News

प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे “न समजलेले आईबाप” यावर उद्या व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्या शनिवार दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे “न समजलेले आईबाप” या विषयावर श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव यांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अधिक वावरत असल्याने पालक आणि पाल्य यांच्यात संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला पालकांविषयीची समज कमी झाली आहे. त्यामुळे अनेकदा पालकांना आपल्या मुलांची बदलती मानसिकता समजून घेण्यात अडचणी येत आहेत. पाल्य आणि पालक यांच्यातील वैचारिक दुवा साधण्यासाठी वसंत हंकारे आपल्या ओघवत्या शैलीत पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या धावपळीच्या युगात आई-वडील आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे, त्यामुळे आई-वडिलांच्या त्यागाची आजच्या पिढीला जाणीव राहिलेली नाही. समाजामध्ये कौटुंबिक मूल्य जतन करणे आणि आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव आजच्या पिढीला करून देणे हा या व्याख्यानाच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानातून समाज प्रबोधन करत आजच्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम सेना हिंदुस्तान आपल्या संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. आजच्या पिढीला नवी दिशा देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तरी बेळगावमधील जास्तीत जास्त पालक विद्यार्थी आणि नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *