Tuesday , March 3 2026
Breaking News

समर्थ नगर येथील श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाकडून नववर्षाचे उत्साहात स्वागत

Spread the love

बेळगाव : समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर यांच्यावतीने लहान मुला-मुलींसाठी पारंपारिक वेशभूषा करून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न मंजुषा, तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी समर्थ नगरमधील ज्येष्ठ नागरिक ओकाराम मेवाड, सुधाकर कडोलकर, नागेश गावडे, निर्मल कणेरी, आप्पाजी कुंडेकर, लक्ष्मण कुंडेकर, मलाप्पा सुलगेकर, अरुण गावडे, माला कणेरी, मंगल गावडे, शांता लोहार, सावित्री कणेरी, अनंत देशपांडे, पांडुरंग कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये 100 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धा शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर श्री एकदंत सांस्कृतिक भवन विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव येथे घेण्यात आले.
एकदंत युवक मंडळाच्या दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने महिला लहान मुलांकरिता अनेक उपक्रम राबवले जातात.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *