Tuesday , March 3 2026
Breaking News

युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव तालुका पोल्ट्री उद्योग समूहाच्या वतीने निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात तालुका पोल्ट्री उद्योग समूहाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव तालुक्यात बारामती कृषी केंद्र आणण्याचा संकल्प केला असून बारामती कृषी केंद्र बेळगावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशा आशयाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य माजी निवडणूक प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट श्री. प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुखांना विनंती करण्यात आली आहे की, बेळगाव तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या उत्थानासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर पक्षाला चालना देण्यासाठी, बेळगाव जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बारामती कृषी केंद्र बेळगावात आणण्याचे संकल्पित केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी बेळगाव जिल्हा अध्यक्ष राजू पाटील, प्रचलित जिल्हा सचिव महांतेश कोळूचे यांच्या उपस्थितीत पोल्ट्री उद्योग समूहाचे अध्यक्ष ब्रह्मानंद गवस, सचिव कार्तिक बाचीकर, खजिनदार सागर पाटील यांनी वरील आशयाचे निवेदन माजी कर्नाटक राज्य निवडणूक प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट श्री प्रकाश के. मोरे यांना देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *