Sunday , July 26 2026
Breaking News

गुरुकुल शिक्षण पद्धतीत संस्काराला महत्त्व

Spread the love

 

जीनरत्न रोटे ; पार्श्वनाथ गुरुकुलाचा वार्षिकोत्सव समारंभ

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण संस्था आणि विद्यार्थी अपडेट होत आहेत. ही बाब योग्य असली तरी संस्कारांमध्ये समाज कमी पडत चालला आहे. गुरुकुल सारख्या संस्थांमध्ये संस्कारमय शिक्षण दिले जात आहे. त्याचा जैन व जैनेत्तर समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्माचार्याश्रमाचे अध्यक्ष जीनरत्न रोटे यांनी केले. स्तवनिधी येथील बाल विकास मंदिर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संचालक अभियंते बी.बी. बेडकीहाळे यांनी स्वागत केले. संस्थेचे सेक्रेटरी सुनील बल्लोळ यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी लाठी काठी, मल्लखांब, देशभक्तीपर, धार्मिक गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाले मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक महावीर पाटील, पंकज पाटील, राजू पाटील- अक्कोळ, आदमअली पिरजादे, रावसाहेब जनवाडे, एन. बी. कोल्हापुरे, प्रा. डॉ. राकेश तावदारे यांच्यासह संस्थेच्या विविध शाळांचे पदाधिकारी, अक्षर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *