Tuesday , March 3 2026
Breaking News

हर्षिता ठाकूरसह अन्य सहा जणांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात काल एकूण आठ ठिकाणी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरात सर्वत्र शोभायात्रा काढण्यात आली होती. बेळगाव शहरालगत असणाऱ्या पिरनवाडी येथे देखील हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुरू असलेल्या शोभायात्रे दरम्यान हर्षिता ठाकूर यांनी पिरनवाडी येथील प्रार्थना स्थळासमोर शोभायात्रा येताच अवमानकारक हातवारे करून अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या. त्याचप्रमाणे हिंदू संमेलनादरम्यान भाषण करीत असताना आपल्या भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने पिरनवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हर्षिता ठाकूर यांच्यावर प्रार्थना स्थळासमोर अन्य धर्मीयांविरोधात अपमानास्पद हातवारे करून भाषणातून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षिता ठाकूर यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यासोबतच त्यांच्यासह अन्य सहा जणांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी भागातील इतर धर्मातील समाज बांधवांनी ग्रामीण पोलीस स्थानकासमोर ठिय्या मांडला आणि हिंदू संमेलनादरम्यान भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या हर्षिता ठाकूर यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी एसीपी नारायण बरमनी यांनी हर्षिता ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जमावाला शांत केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *