Sunday , September 20 2026
Breaking News

डीजीपी रामचंद्र राव यांचे कार्यालयातच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल

Spread the love

 

बेंगळुरू : सध्या डीसीआरई म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी डीजीपी रामचंद्र राव यांचा कार्यालयातच अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

डीजीपी रामचंद्र राव यांनी ड्युटीवर असताना आपल्या कार्यालयातच अनेक महिलांशी अश्लील चाळे केल्याचे, त्यांना मिठी मारल्याचे आणि चुंबन घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे सबंध पोलिस विभागाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.

रामचंद्र राव हे सोन्या तस्करी प्रकरणात तुरुंगात असलेल्या अभिनेत्री राण्या राव यांचे सावत्र वडील आहेत. डीजीपी असताना रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रामचंद्र राव यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व थरातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *