Friday , March 6 2026
Breaking News

विज्ञानाचा आविष्कार अन् कलेचा जागर : ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये प्रदर्शन संपन्न!

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘स्पेक्ट्रम’ व ‘आकार’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. किरण यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे प्रो. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, प्राचार्या सौ. सोनाली कंग्राळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांनी व कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. प्रदर्शनामध्ये विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना असे नमूद करण्यात आले की, “विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून ती विचार करण्याची एक पद्धत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनाचे मान्यवरांनी कौतुक केले. या प्रदर्शनास पालकांचा आणि परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *