Tuesday , March 3 2026
Breaking News

विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘वृंदावन सिटी प्राइड’ प्रकल्पाचे उद्या वाघवडे येथे भव्य अनावरण

Spread the love

 

बेळगाव : शहराच्या धाकधुकीच्या जीवनापासून लांब निसर्गरम्य व शांत परिसरात विकास बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्यावतीने “वृंदावन सिटी प्राईड” हा आत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प वाघवडे रोड, रंगोली बस स्टॉप समोर, वाघवडे येथे साकारण्यात येत असून या प्रकल्पाला केजीपी मंजूर एन.ए. लेआउट मंजूर झाले आहे. हा प्रकल्प खानापूर -बेळगाव महामार्गापासून वाघवडे रस्त्यावर अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर वाघवडे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. उद्या 26 जानेवारी 2026 रोजी या प्रकल्पाचे अनावरण होणार आहे. या प्रकल्पासाठी एन.ए. लेआउट क्रमांक 116/2025/2878/-81 असून एन. ए. ऑर्डर क्रमांक 684000 (दिनांक 08/03/2025) नुसार सर्व कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे त्यामुळे ग्राहकांना संपूर्ण सुरक्षितता व विश्वासार्हता गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ‘वृंदावन सिटी प्राईड’ प्रकल्पामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये वीजपुरवठा, रुंद व मजबूत रस्ते, गटार व्यवस्था, सुसज्ज पाणीपुरवठा (पूर्ण जलप्रणाली), उद्यान तसेच पथदीप यांचा समावेश आहे. नियोजनबद्ध असलेला हा प्रकल्प राहण्यासाठी तसेच भविष्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या या प्रकल्पामध्ये प्लॉट बुकिंग सुरू असून ‘मर्यादित कालावधीसाठी प्लॉट बुक करा आणि सोन्याचे नाणे मोफत मिळवा’ अशी विशेष ऑफर देखील देण्यात आली होती. त्यामुळे इच्छुक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मुख्य कार्यालय लक्ष्मी झेरॉक्स बिल्डिंग टाटा शोरूम, उद्यमबाग बेळगाव-590009 येथे असून, शाखा कार्यालय 143/3, पहिला मजला, शिवाजीनगर, खानापूर बेळगाव-591302 येथे आहे.
अधिक माहिती व प्लॉट बुकिंगसाठी इच्छुक नागरिकांनी कार्यालयीन वेळेत (काळी 10 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत) संपर्क क्रमांक: 0831 4071323/7259619696 वर संपर्क साधावा, असे आवाहन विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *