Friday , April 17 2026
Breaking News

शिस्त, शांततेत महालक्ष्मीची त्रैवार्षिक यात्रा पार पाडा

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकीहोळी; निपाणी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या नूतन मंदिराचा वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना कळसारोहण आणि रविवारची यात्रा मंगळवारपासून (ता.३ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. या काळात वीज, पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधा राबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे. भाविकांनीही शिस्त आणि शांततेत हा सोहळा पार पाडावा असे आवाहन खासदार प्रियांका जारकीळी यांनी केले. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, यात्रेच्या वेळी भाविकांची गर्दी होणार असून त्या दृष्टीने पोलिसांनी वाहन पार्किंग, चोऱ्या अशा घटनांना आळा घालावा. शिवाय २४ तास वीज पुरवठा करण्यासह मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांना केले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, या यात्रेसाठी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांची गर्दी होणार आहे. सोहळा काळात तालुका पातळी सर्वच अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या मुख्यालयात राहवेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह व्हाईट आर्मी आणि एनसीसीचे छात्र कार्यरत राहणार आहेत. चोऱ्या घडणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शिवाय अग्निशामक दलासह हालशुगरचा बंबही कार्यरत राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी सोळा काळात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यात्रा कमिटी अध्यक्ष आशिषभाई शाह यांनी, नेते मंडळी व लोकवर्गणीच्या सहकार्याने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी मिरवणूक, होम हवन असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांना सुलभ दर्शनासाठी योगेश सोय केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी न करता शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन केले. तहसीलदार सुरेश मुंजे यांनीही यात्रा काळातील सोयी सुविधा बाबत माहिती दिली. नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनीही यात्रेमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नसल्याचे सांगितले
यावेळी प्रशांत गुंडे, राजेश कदम, सुजय पाटील, राजेंद्र वडर, बसवराज पाटील, तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी, रवींद्र शेट्टी, दीपक सावंत, संदीप चावरेकर, किरण पाटोळे, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह आजी माजी नगरसेवक, यात्रा कमिटी पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *