Tuesday , March 3 2026
Breaking News

५ वर्षे ११ महिने १९ दिवस फरारी आरोपीला जामीन

Spread the love

 

बेळगाव : चेक बाउन्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. परशुराम शंकर कोलेकर रा. तारिहाळ असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात पुंडलिक गुंडू पाटील रा. उद्यमबाग यांनी दावा केला आहे. आरोपी परशुराम हा २०१२ साली फिर्यादीला भेटला होता. मी गुड्स वाहन घेणार असून पैशाची गरज आहे. त्यासाठी हातउसणे पैसे द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये फिर्यादीने रोख आणि चेक स्वरुपात एकूण २ लाख ९० हजार रुपये दिले. सदर व्यवहाराबाबत दोघांमध्ये करारपत्रही करण्यात आले. काही महिन्यात पैशाचा परतावा करतो, असे परशुरामने सांगितले होते. मात्र पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करण्यासह प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला नोटीस पाठवून सातवे जेएमएफसी न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार सातवे
जेएनएफसी न्यायालयाने आरोपीला ६ जानेवारी २०२० रोजी सदर रक्कम फिर्यादीला द्यावी, अन्यथा सहा महिन्याची शिक्षा भोगावी असा निकाल देत आरोपीचा जामीन रद्द केला. तसेच सदरी न्यायालयाने आरोपीला शिक्षेसंदर्भात वॉरंट जारी केले. तेव्हापासून आरोपी ६ वर्षे फरारी होता.
हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याला १७ डिसेंबर २०२५ रोजी अटक करून सातवे जेएनएफसी न्यायालयासमोर हजर केले. त्यानुसार त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. सातवे जेएनएफसी न्यायालयाच्या निकालाविरुद्ध आरोपीने पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत निकालाला स्थगिती द्यावी व जामीन मंजूर करावा, असे अपील केले होते. आरोपी आणि फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सातवे जेएनएफसी न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देत सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *