Sunday , September 20 2026
Breaking News

केएलई संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याने अमर बागेवाडी यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. त्यामध्ये येथील प्रवीण उर्फ अमर बागेवाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.
माजी सभापती किरण कोकरे यांनी, अमर बागेवाडी यांची सलग दुसऱ्यांदा केएलई संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड म्हणजे निपाणी शहराचा गौरव झाला आहे. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकसह नागरिकांच्या आरोग्याबाबत सुविधा राबवण्याची मागणी केली. अमर बागेवाडी यांनी शेतकऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळात निपाणी शहरातील नागरिकांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, प्रवीण भाटले, चंद्रकांत जासूद, गजेंद्र पोळ, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, संदीप कामत, माजी नगरसेवक सुभाष कांबळे, मुकुंद रावण शशिकांत चडचाळे, रवींद्र चंद्रकुडे, रियाज बागवान, रवी श्रीखंडे, प्रथमेश जासूद, दिलीप जाधव, युवराज पोळ, शरीफ बेपारी, अशोक लाखे, दीपक ढणाल, किसन दावणे, प्रवीण हेगडे, रॉबिन दावणे, सुधीर माळवे, सुरेश बुडके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *