Sunday , September 20 2026
Breaking News

अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनासह पारितोषिक वितरण समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शैक्षणिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेच्या उपाध्यक्षा अनिता रामगोंडा पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून त्रिशला पाटील (यड्रावकर) होत्या.
प्रारंभी मुख्याध्यापक जे. एस. पाटील सर यांनी स्वागत केले. स्तवनिधी येथील पी. बी. आश्रमचे कार्यकारी संचालक, महावीर पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. महावीर पाटील यांनी, पार्श्वमती शाळा ही शील, ज्ञान, प्रेम, सेवा, व्यवस्था या समंतभद्र महाराजांच्या पंचसूत्री वर चालते. या शाळेत आता मुलांनाही प्रवेश सुरू असून पार्श्वमती कन्या विद्यालय ऐवजी ते नाव श्री पार्श्वमती विद्यालय असे करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अनिता पाटील, त्रिशला पाटील (यड्रावकर), इंद्रजीत सोळांकुरे, राजू पाटील, श्रावणी जम्बोकुमार रांगोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजू पाटील यांची कोल्हापूर येथील श्री. देशभूषण हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाच्या संचालक पदी निवड झाली आहे, श्री.पी. बी. आश्रम स्तवनिधीचे कार्यकारी संचालक महावीर पाटील यांची बेल्लद बागेवाडी येथील भरतेश विद्यालयाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय शाळेला सहकार्य करणारे, पालक प्रतिष्ठित नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी व्ही. डी इंदलकर, शाळेचे सेक्रेटरी डी. बी. मगदूम, संचालक ए. के. व्हनशेट्टी, एस. बी. पाटील, आर. बी. पाटील, एस.व्ही. रांगोळे, ए. बी. सोळांकुरे उपस्थित होते. पी. बी. कळंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. खोत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *