Monday , September 21 2026
Breaking News

रोहिदास जयंती खासबाग येथे उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : खासबाग परिसरात संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त रोहिदास महाराजांच्या पालखीचे पूजन, आरती, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली असून संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रांगोळीने सजविण्यात आला होता. त्यामुळे सर्व परिसर रोहिदासमय झाला होता.

यावेळी रोहिदास महाराजांच्या प्रतिमा व छायाचित्रांचे पूजन अध्यक्ष भीमराव वाय. पवार आणि सहाय्यक आयुक्त कल्याणी वेंकटेश कांबळे तसेच संतोष होंगल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ह.भ.प. लव नार्वेकर महाराज यांच्या प्रवचन व कीर्तनाने उपस्थितांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव आला.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शेवटी मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी जयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *