
बेळगाव : शिक्षकाकडूनच समाज घडवण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. जगाचे चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकच पार पाडत आहेत. शिक्षण पद्धतीत किती ही बदल झाले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही, असे गौरवद्गार ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूरचे श्री. पीटर डिसोजा यांनी चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित आयोजित सदिच्छा सोहळ्यात काढले.
सुरुवातीला स्वागत गीत व इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष दौलत अण्णा कुगजी, सचिव प्रसाद मजूकर, निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील, श्री. पी. जी. पवार, नेताजी को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन श्री. डी. जी. पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले . चांगळेश्वरी प्रतिमेचे पूजन सौ. कांचन मजुकर यांच्या हस्ते झाले तर सरस्वती प्रतिमेचे पूजन संचालक चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले.
संचालक व सहशिक्षक नरेंद्र मजुकर यांच्या प्रास्ताविकेनंतर श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल प्राथमिक शाळा ,ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान व संस्थेच्या विविध शाळा, सामाजिक संघटना व सोसायटीकडून निवृत्त मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांचा हार, शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांनी धामणेकर सरांच्या कार्यांचा गौरव केला. ते म्हणाले की, वीस वर्षे शिवठाण सारख्या दुर्गम भागामध्ये कार्य करून व त्यांचा विकास करुन अनेक विद्यार्थ्यांना घडविले. धामणेकर सरांसारख्या निष्ठावंत व कार्यशील शिक्षकांमुळेच संस्थेचा मुलींचा शिक्षणाचा व दुर्गम भागात शिक्षण प्रसारचा हेतू साध्य झाला प्रामाणिक शिक्षकांमुळेच संस्था टिकली, वाढली व त्याचा लौकिकही वाढला.
याप्रसंगी सचिव प्रसाद मजूकर, माजी मुख्याध्यापक बी बी पाटील, पी.जी पवार, सी.आर.पी महेश जळगेकर, डी.जी पाटील, येळ्ळूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील, विद्यमान उपाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच विद्यार्थ्यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.
या कार्यक्रमाला माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, मोहन पाटील, राजेंद्र चलवादी यांच्यासह युनियन बँकेचे मॅनेजर श्री. अभिजीत सायमोते, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी पी कानशिडे, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस बी मजुकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत यांच्यासह विविध शाळातील मुख्याध्यापक व सहशिक्षक, शिक्षण शिक्षणप्रेमी सामाजिक क्षेत्रातील मंडळ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी केले तर आभार एल. एस. बांडगे यांनी मांडले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. वाय. बी कंग्राळकर एम. एम. डोंबले, टी. एस बोकडेकर, व्ही.पी जीवाई, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्नेहल मजुकर, नंदा मुचंडी, सारिका पाटील, अंकिता पाटील, दीपा हट्टीकर, संजीवनी बेडरे व आरोही पाटील यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष नियोजन केले.

Belgaum Varta Belgaum Varta