Sunday , July 26 2026
Breaking News

भिवशीतील कर्करोग ग्रस्त विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी ‘अरिहंत’कडून आर्थिक मदतीचा धनादेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भिवशी (ता.निपाणी) येथील विद्यार्थी वेदांत विजय पाटील याला हाडाचा कर्करोग झाल्याची माहिती समजताच समाजातून मदतीचा हात पुढे येत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपचारासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
अचानक उदभवलेल्या या गंभीर आजारामुळे पाटील कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. उपचारा साठीमोठ्या प्रमाणात खर्च येणार असून अशा वेळी मिळालेल्या या मदतीमुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. उत्तम पाटील यांनी वेदांतच्या परिवाराची आपुलकीने विचारपूसकरत त्यांना धीर दिला. खचून न जाता धैयनि सामना करा. वेदांतच्या उपचारासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, असाविश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला. वेदांत लवकर बरा व्हावा, त्याला नवसंजीवनी व बळ मिळावे, अशी सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. अरिहंत उद्योग समूहाने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भिवशी येथील उत्तम पाटील युवा शक्तीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *