Tuesday , March 3 2026
Breaking News

महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांच्याकडून पुस्तकांचा संच भेटी दाखल

Spread the love

 

बेळगाव : उचवडे (ता. खानापूर) येतील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या पाच पुस्तकांचा संच भेटी दाखल दिला.
महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्याकडे त्यांनी पुस्तके सुपूर्द केली. याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे विचार शालेय जीवनापासून मुलांमध्ये रुजावे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी खानापूर आणि बेळगाव तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अशा एकूण पन्नास शाळांना त्यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांचा संच भेटीदाखल दिला आहे.
सूर्याजी पाटील हे प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक असून, सध्या ते ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ बेळगाव शाखेचे कार्यशील सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
उचवडे येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी एस. आर. पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले असून, त्यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *