Monday , September 21 2026
Breaking News

अनगोळ येथे श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात, संकेत सुरुतेकर ठरला ‘श्री विश्वकर्मा २०२६’

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ लोहार गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या विश्वकर्मा मंदिराच्या आवारात बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस् यांच्या वतीने आयोजित अनगोळ मर्यादित “श्री विश्वकर्मा २०२६” टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत समर्थ जिमच्या संकेत सुरतेकर ‘श्री विश्वकर्मा किताब’चा मानकरी ठरला.
प्रमुख पाहुणे दीपक सोमण्णाचे, वनिता सुतार, पिंटू डी. के., राज एस. के., सागर लोहार, सचिन लोहार, रमेश कुमार, संतोष मंडोळकर, अनिल सुतार, सिद्धलिंगय्या अक्की, अतीथ बेलेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल अंबरोळे, राजेश लोहार, मिस्टर इंडिया रणजीत किल्लेकर, सुनील चौधरी, भरत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, संतोष सुतार, नारायण चौगुले, तर स्टेज मार्शल म्हणून विनोद मेत्री, व पवन यांनी काम पाहिले.

अंतिम निकाल असा : संकेत सुरतेकर समर्थ जिम, प्रभू चौगुले – बर्न आऊट जिम, श्रीहरी बेळगावकर – व्ही. स्क्वेअर जिम, मनीष सांबरेकर हनुमान तालीम, निरंजन जाधव – हनुमान तालीम, विनायक जांबोटकर – वी. स्क्वेअर जिम, रोहित बिर्जे – बर्न आऊट जीम, श्रीपाद कम्मार – एस. आर. एस. फिटनेस, प्रताप तोरस्कार – बॉडी टोन जिम, रोहित झंगरूचे – समर्थ जिम.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *