Tuesday , March 3 2026
Breaking News

बनावट आधार कार्डच्या आधारे जमीन बळकावणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

 

संकेश्वर : बनावट आधार कार्ड तयार करुन दुसऱ्याची जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती.

शिवरुद्र प्रधान कुदनुरी (वय 82, कुरणी, ता. हुक्केरी), गंगव्वा शेट्टेप्पा मुदपाकी (48, मूळ उळागड्डी, खानापूर; सध्या रा. कुरणी, ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यानंतर आता बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीच्या विक्रीप्रकरणी सब-रजिस्ट्रार आणि बॉण्ड रायटर यांना पोलिसांनी अटक केले आहे. बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी हुक्केरी सब-रजिस्ट्रार मडीवाळय्या बानिमठ आणि बॉण्ड रायटर आनंद दड्डीमनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. A7 आणि A8 हे आरोपी होते.

हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. दोन्ही आरोपींना यमकनमर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि हुक्केरी पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर, त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आणि गोकाक उप-कारागृहात पाठवण्यात आले.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी ढुंडप्पा शंकर कुद्नुरी (कुरणी, ता. हुक्केरी) यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार केले होते. या बनावट कागदपत्रांच्या आधारे संकेश्वर उपनिबंधक कार्यालयात हजर राहून संशयितांनी कुरणी गावातील 1 एकर 13 गुंठे जमीन ही तिसऱ्या व्यक्तीस विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्या दोघांना याआधीच अटक केली होती.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *